व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: आद्य पत्रकार महर्षी नारद जयंती निमित्त विश्व संवाद केंद्र विदर्भ तर्फे दरवर्षी जेष्ठ पत्रकारांना महर्षी नारद पुरस्कार देऊन सन्मान प्रदान करण्यात येत असतो. या वर्षी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार दिनेशकुमार शुक्ल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अकोला महानगर संघ चालक गोपालजी खंडेलवाल, अकोला महानगर कार्यवाह रुपेश शाह उपस्थित होते. अशी माहिती अकोला महानगरप्रचार विभाग प्रमुख महेश मोडक यांनी दिली.