मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव: आजपासून कोविडची लक्षणे किंवा त्रास नसणारे कोरोना बाधितांसाठी होम आयसोलेशन सुविधा बंद करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. आता एकमेव संस्थात्मक अलगीकरण हाच एकमेव पर्याय असणार आहे.
खामगाव उपविभागातील ग्रामिण भागातील रुग्णास गावातील शाळेमध्ये किंवा इतर उपलब्ध सोईच्या ठिकाणी आयसोलेट केले जाईल. खामगाव शहरातील रुग्ण यापूर्वी सुरू असलेले घाटपुरी कोविड सेंटर किंवा पॉलिटेक्निक कॉलेज हॉस्टेल (जलंब रोड) महिला असल्यास पंचशील धर्मांर्थ दवाखाना (शाळा क्र 6 जवळ) या ठिकाणी आयसोलेट राहतील असे नियोजन प्रशासनाने केले आहे. भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास आणखी 5 ठिकाणे शोधन्यात आली आहेत. ग्रामीण भागात पेशनटने आपले स्वतःचे अंथरून वापरायचे असून त्यांचे कुटुंबीय जेवणाचा डबा पोचवतील. सेंटरवर पाणी लाईट साफसफाईची व्यवस्था ग्रामपंचायतकडे तर शहरामध्ये नगर परिषद कडे असेल संबंधित गावाच्या आशा वर्कर पेशटची रजिस्टर मध्ये नियमित नोंदी घेऊन त्यांचे रेग्युलर चेकअप करतील काही त्रास असल्यास पेशनट खामगाव उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात येईल. याकामी रुग्णाला शाळेत पोचवण्यासाठी जबाबदारी ग्रामसमिती सदस्य तर शहरात कर्मचारी टीम नेमली जाईल. रुग्णाने नकार दिल्यास त्या गावचे बिट जमादार व पोलीसांची मदत घेवून रुग्णाला सेंटरवर पोचवतील. या कामात इतर विभागाचे कर्मचारी वर्ग यांचे सुद्धा ड्युटी लावली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी तर शहरी भागासाठी नगर परिषद मुख्याधिकारी काढतील. नागरिकांनी कामी सहकार्य करावे ही बाब रुग्णासह कुटुंबाचे हिताची असून पॉझिटिव्ह रुग्णांनी नेमून दिलेल्या ठिकाणी आयसोलेशनमध्ये राहावे. म्हणजे कुटुंबीय व इतर्राना संसर्ग होणार नाही व कोरोना साखळी तुटेल या नवीन नियमांची अंमलबाजवणी 26 मेपासून होत आहे. याप्रसंगी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या परिसरातील गावातील आयसोलेशन सेंटरसाठी आवश्यक ते सहकार्य करावे योगदान द्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.