व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: भारतात कोविड रुग्णांवर एकतर औषधाचा चुकीचा डोस किंवा चुकीचे औषध दिल्या जात आहे. रुग्णांचे मृत्यू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नव्हेतर योग्य उपचाराअभावी होत आहेत. डब्लूएचआे म्हणजेच तथाकथीत आरोग्य संघटनेने सांगितलेल्या चुकीच्या मेडिकेशन प्रोटोकाॅलमुळे हे घडत आहे. त्याचप्रकारे डायबेटीस व ब्लडप्रेशन सारख्या अनेक आजारांमध्ये ज्या औषधी दिल्या जातात. त्यामुळे अनेक आाजर दुरुस्त तर होतच नाहीत. मात्र त्यामुळे इतर आजार बळावत आहेत. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नसून वर्ल्ड डिसीज ऑर्गनायझेशन असल्याचा खळबळजनक आरोप शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी येथे केला.
कोरोनामुळे होणा-या मृत्यूंची कारणमिमांसा करतांना ते म्हणाले, सध्याच्या घडीला जे लोक मरण पावत आहेत. ते कोरोना विषाणूमुळे नव्हेतर साध्या सर्दी पडश्याच्या आजारावर चुकीचे औषधोपचार आणि मास्कच्या अतिरेकी वापरामुळे मरत आहेत. या सर्व परिस्थितीला डब्लूएचआे जबाबदार आहे. आयुर्वेदीक व होमियोपॅथी च्या औषधोपचाराने कोरोनाच्या पेशंटला फायदा होत असून अजिबात मृत्यू नाहीत. मग असे असूनही या दवाखान्यात कोरोना उपचाराला प्रतिबंध का केला गेला? किंवा त्या डॉक्टरांना कोरोनाच्या उपचारासाठी मनाई का केली जात आहे. डब्लूएचआे ने कोरोनासंबधी गाईडलाईन्स जारी करतांना सर्वप्रथम मास्क जरूरी असल्याचे सांगितले. खरतंर मास्कच्या वापरामुळे नैसर्गीकरित्या मोफत मिळणा-या ऑक्सीजन घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. कोरोनानंतर आता काळी बुरशी आजार आला. अंधाधुंद स्टिराईड व चुकीच्या औषधोपचारामुळे आता लोक मरत आहेत. अशा घटनांना जबाबदार असलेल्या डॉक्टर व हॉस्पीटल प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. जागतिक आरोग्य संघटना आपल्या आवाहनावर ठाम नाही. कधी काही म्हणते तर कधी दुसरेच. यामुळे वैद्यकीय यंत्रणा चुकीचा औषधोपचार करीत आहे. यामुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. काही ठिकाणी व्हॅक्सीन घेतल्यानंतर नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. आयसीएमआर ही डब्लूएचआेची गुलाम असणारी संस्था आहे. त्यामुळे डब्लूएचआे वर बहिष्कार टाकला पाहिजे आणि बायकॉट डब्लूएचएआे ही मोहिम सुरु केली पाहिजे असे आवाहनही पोहरे यांनी केले.
देश अनलॉक करा..
कोरोनाचा बागुलबुवा दाखवण्यापेक्षा लाॅकडाऊन हटवावे, ज्यांचे आर्थीक नुकसान झाले अशांना नुकसानभरपाई मिळावी, मास्कची सक्ती बंद करावी, लसीची सक्ती बंद करावी, शाळा, कॉलेज, न्यायालये सुरु करावीत, शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्याही प्रकाश पोहरे यांनी केल्या आहेत.
कोरोना.. कशात काय अन फाटक्यात पाय..!
जिल्हा, राज्य व देशातील कोरोनाच्या एकंदरीत परिस्थितीची वास्तविकता मांडणारे कोरोना.. कशात काय अन फाटक्यात पाय..! या पुस्तकाचे प्रकाशन दैनिक देशोन्नतीचे संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार दिनेशकुमार शुक्ल, मिरसाहेब, सिद्धार्थ शर्मा यांच्याहस्ते झाले.