सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल सुरु झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते! – देवेंद्र फडणवीस

0
373

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. इमारतीची उपलब्धता असूनही सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल सुरु होवू शकले नाही ही दुदैवी बाब होय. जर हे हॉस्पीटल सुरु झाले असते तर याठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार होवून अनेक जीव वाचू शकले असते असे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रविवारी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये पुरेसी यंत्रसामुग्री असूनही केवळ मनुष्यबळाअभावी हॉस्पिटल सुरू झाले नाही. वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून घेण्यात सरकार अपयशी झाले अशी टिकाही फडवणीस यांनी केली. टीबी वॉर्डमध्ये 60 बेडच्या रुग्णालयाचीही तीच अडचण आहे. प्रशासनाने योग्य नियोजन करून तातडीने सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल सुरु करावे अशी सुचनाही त्यांनी केली. यावेळी माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, भाजपचे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक गिरीश जोशी उपस्थित होते.
मोदीजींनी महाराष्ट्राला खुप दिले
महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याविषयी सहाय्य केले. परंतु विरोधक त्याचा कांगावा करीत आहेत. त्यांना त्याचे काहीही महत्व नाही. केंद्राकडून आलेल्या व्हेंटिलेटरर्सचा उपयोग राज्यात केला गेला नाही. काही ठिकाणी बरेच दिवस ते पडून राहिल्याने दुरुस्तीची वेळ आली. सरकारचे कुठलेही नियोजन नसल्याने कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत चालली आहे.
आरोग्य यंत्रणेने सजग रहावे
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोविडची तिसरी लाट येणार आहे असल्याचे बोलले जात आहे. आतापासूनच मुलांसाठी आयसीयू तयार करण्याची गरज आहे.

Previous articleनागरिकांना दिलासा; आजपासून सकाळी 7 ते 11 या वेळेत मिळणार जीवनावश्यक सेवा
Next articleजिल्ह्यातील रुग्णालयांना 683 रेमडेसिवीरचे वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here