नागरिकांना दिलासा; आजपासून सकाळी 7 ते 11 या वेळेत मिळणार जीवनावश्यक सेवा

0
309

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रशासनाने शनिवारी संध्याकाळी काढलेल्या आदेशानुसार नागरिकांना कडक निर्बंधापासून दिलासा मिळाला आहे. या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 या वेळेत सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सुरु राहणार आहेत. सदरचे आदेश 15 मे रोजी रात्री 12 वाजेपासून ते 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.
जिल्ह्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 1 ते 15 मेपर्यत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र 15 मेरोजी संध्याकाळी लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 या वेळेत सर्वप्रकारची जीवनावश्यक दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने, भाजीपाला, दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करता येणार आहे. सायंकाळी 5 ते 7 यावेळेत सुद्धा या सेवा सुरु राहतील. सर्व प्रकारच्या राष्ट्रीयकृत, खासगी बँका, कृषी सेवा केंद्र, कृषी निविष्ठांची दुकाने, पेट्रोलपंप सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहतील. अत्यावश्यक सेवांना सकाळी 11 ते 8 या वेळेत सुद्धा पेट्रोल मिळू शकेल. तर सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत रेस्टांरंट, भोजनालय, उपहारगृहांना घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी राहील. कृषी उत्पन् बाजार समिती मात्र 22 मे पर्यत बंद राहणार आहे. सर्व वकिलांची कार्यालये सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहतील. नागरिकांनी या वेळेतच आपली कामे उरकून घ्यावीत व नियमांचे काटेकोर पालन करून कोरोना आजाराच्या निर्मुलनासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Previous articleबुलडाण्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित! जिल्हा स्वंयपूर्ण करणार : डॉ. राजेंद्र शिंगणे
Next articleसुपरस्पेशालिटी हॉस्पीटल सुरु झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते! – देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here