थेट बांधावर मिळतील खते, बियाणे; अकोला कृषी विभागाचे नियोजन

0
277

व-हाड दूत न्युज नेटवर्क 
अकोला: जिल्हामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके खरेदीसाठी गर्दी होऊ नये. याकरीता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.कांतप्पा खोत यांच्या मार्गदर्शनखाली नियोजन करण्यात आले असून त्याअनुषंगाने अकोला तालुक्यातील शेतकरी गटाच्या वतीने DAP – 40 गोणी,10:10:26 – 40 गोणी , Urea -20 गोणी एकुण 1 लक्ष 7 हजार रूपये रासायनिक खते खरेदी करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी डि.एस.प्रधान , आत्माचे तालुका तंञज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.शेगोकार, पं.स कृषी अधिकारी अनिल राठोड, धनंजय मेहेरे, सुभाष राऊत व गटातील सदस्य उपस्थित होते. ही खते व बियाणे शेतकरी गटाकडे मागणी नोंदवल्यानुसार शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहोच केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

Previous articleबुलडाणा जिल्हयातही १० ते २० मेपर्यंत कडक लॉकडाऊन
Next articleलॉकडाऊनमध्येही 654 पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here