दोघे गजाआड, एलसीबीची धडाकेबाज कारवाई
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: येथील दोन नामांकित रुग्णालयाचे कर्मचारी रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करतांना एलसीबीच्या पथकाने पकडले. ही घटना आज 07 मे रोजी सायंकाळी घडली. एका हॉस्पीटलचे दोन आणि दूसºया रुग्णालयाचा एक कर्मचारी संगनमताने एकुण ७ रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पीएसआय जिंदमवार आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून या तिघांना दोन ठिकाणाहून जेरबंद केले. या दोन्ही रुग्णालयाला मेडीकल अटॅच आहेत. याच मेडीकलमधून रेमडेसीवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकण्याचा गोरख धंदा सुरु असल्याचा संशय पोलिसांना आहे. संबंधीत रुग्णालयाच्या डॉक्टरांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत पोलिस कारवाई सुरु होती.