व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: भारतीय डाक विभागात पोस्ट मास्तर, सहा. पोस्ट मास्तर, डाक सेवक अशा ११४ पदांची भरती होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती, नियम व अटी https://indiapoast.gov.in या अथवा https://appost.in/gdsonline या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज याच संकेतस्थळावर अपलोड करावयाचा असून त्यासाठी बुधवार दि.२६ पर्यंत मुदत आहे,असे प्रवर अधीक्षक डाकघर, अकोला विभाग, अकोला यांनी कळविले आहे.