नांदु-यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार : 3 जण ताब्यात

0
314

एलसीबीच्या पथकाने 10 इंजेक्शनही केले जप्त

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्युज नेटवर्क 

नांदुरा: कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मजबुरीचा ग़ैरफ़ायदा घेऊन काही जण रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत. बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 5 मे रोजी धडाकेबाज कार्रवाई करीत काळ्याबाजारात विकल्या जाणारे 10 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केले असून आरोपीला जेरबंद केले आहे. तसेच अन्य दोघे जण ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कार्यवाही आज संध्याकाळी 4 वाज़ेदरम्यान नांदुरा येथे करण्यात आली. नांदुरा येथील गैबी नगर मध्ये तीन जण रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून सापळा रचुन सदर कार्यवाही करण्यात आली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार एपीआय मोरे आणि पथकाने ही यशस्वी कार्रवाई केली आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात हा काळाबाजार उघडकीस आणल्याने पोलिसांचे कौतुक होत आहेत. पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यापुर्वीच काळ्याबाजारात रेमडेसीवीर विकणाऱ्यांवर कठोर कार्रवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

Previous articleअकोला मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टरांचे कामबंद
Next articleलसीकरणाचा स्लॉट घोटाळा! कोविड योद्धांच्या नावावर दुस-यांनाच लस; नोंदणीची पद्धत बनली डोकेदुखी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here