व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या इंटर्न डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 5 मे रोजी दुपारी 3 वाजेपासून कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भुमिका घेतल्याने अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.