कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाच्या बेडवर झोपतात नातेवाईक
मलकापूर प्रशासकिय रूग्णालयातील धक्कादायक प्रकार रूग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
मलकापूर :कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाच्या बेडवर चक्क नातेवाईक झोपत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील मुलकापूर शासकिय रूग्णालयात उघडकीस आला आहे़ यामुळे रूग्णालय प्रशासनाचे भोंगळ कारभार समोर आला आहे़ या गंभीर प्रकाराकडे रूग्णालयीन प्रशासन आणि शासनाचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे़ नुकतेच काही दिवसाअगोदर याच रूग्णालयात आँक्सिजन अभावी एका रूग्णाचा जीव गेल्याचा प्रकार घडला होता़ यामुळे येथील आरोग्य व्यवस्था रामभरोसे सुरू असल्याचे समजते़
बुलडाणा जिल्ह्यातील उपजिल्हा रूग्णालय म्हणून ओळखल्या जाणाºया मलकापूर शासकिय रूग्णालयात ३० बेडचे कोरोना रूग्णांसाठी आयसोलेशन वार्ड बनविण्यात आले आहे़ सध्यास्थितीत या कोव्हीड सेंटरमध्ये २५ कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत़ मात्र सदर रूग्णांवर उपचारासाठी आणि देखभाल करण्यासाठी डाँक्टर आणि नर्स येत नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनाच याठिकाणी मुक्काम ठोकून स्वत रूग्णांची काळजी घ्यावी लागत असल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांकडून बोलल्या जात आहे़ काही दिवसाअगोदर रूग्णालयातील विद्युत पुरवठा १ ते २ तास खंडीत झाला होता़ त्या दरम्यान व्हेन्टीलेटरवर उपचार घेत असलेल्या एका कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती़ मात्र या घटनेनंतर येथील रूग्णालय प्रशासनाने याबाबत अद्यापही कुठलीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसूनर येते़ तर आता चक्क कोव्हीड सेंटरमध्ये २४ तास रूग्णांच्या नातेवाईकांचा वावर सुरू असून सदर नातलग थेट कोरोना पाँझिटिव्ह रूग्णाच्या बेडवर त्याच्या बाजूलाच झोपत असल्याचा प्रकार समोर आला असून याची चित्रपितही सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे़ कोव्हीड सेंटर मध्ये फक्त डाँक्टर आणि आरोग्य कर्मचाºयाशिवाय तिसºयाला प्रवेश देता येत नाही़ मात्र याठिकाणी आरोग्य कर्मचारी सोडून फक्त रूग्णांचे नातेवाईक वावर करतांना दिसून येत आहे़ यामुळे मलकापूरात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका अधिक बळावला आहे़ याकडे रूग्णालय प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे़
सुरक्षा रक्षक नसल्याने नातेवाईक कक्षात घुसतात- वैद्यकिय अधिकारी अमोल नाफडे
रूग्णांच्या नातेवाईकांना वारंवार सुचना देवूनही ते कोणत्याही सुचनेला जुमानत नाही़ आणि थेट कोव्हीड कक्षात प्रवेश करून विनाकारण रूग्णाजवळ थांबतात़ याबाबत पोलिस प्रशासनाकडेही सुरक्षेसाठी मागणी केली होती़ मात्र ती मिळाली नाही़ हा प्रकार घडल्यानंतर पोलिस विभागाकडून पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे़ तर रूग्णालयात सुरक्षा रक्षकांचाही अभाव आहे़ यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना आळा घालण्यास अडचणी निर्माण होत आहेत़ नातेवाईकांना प्रवेश करण्यास हटकले असता त्यांच्याकडून राजकिय आणि मोठ्या व्यक्तिंचा दबाव आणल्या जात आहे़ अशी माहिती वैद्यकिय अधिकारी अमोल नाफडे यांनी दिली़