वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5059 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3841 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1218 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.
जिल्हयात कोरोनाचा उद्रेक थांबता थांबेना. यामुळे प्रशासनासमोर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसभरात उपचारादरम्यान हिवरा आश्रम ता. मेहकर येथील 70 वर्षीय महिला, पोटळी ता. नांदुरा येथील 83 वर्षीय पुरूष, किनगांव राजा ता. सिं. राजा येथील 45 वर्षीय महिला, मधु मालती नगर मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1021 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6 हजार 878 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजपर्यंत 410 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.