वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्ह्यातील पहिला खाजगी ऑक्सिजन प्लांट खामगावला साकारला जाणार आहे यासाठी गोएंका ग्रुप ने पुढाकार घेतला असून, प्लांट चे भूमिपूजन नंदकिशोर गोएंका यांच्या हस्ते झाले आहे.हा प्लांट दीड महिन्यात कार्यान्वित होऊन ऑक्सिजन पुरवठा केला जाईल. हा प्लांट जुनुना शिवारात उभारला जात आहे व यासाठी 6 कोटी पर्यन्त खर्च केला जाणार असल्याचे ग्रुप कडून सांगण्यात आले आहे. प्लांट मधून रोज 7 क्युबिक मीटर चा साठा असणारी 500 सिलिंडर उपलब्ध होतील. कोरोंना च्या संकटात हा ऑक्सिजन प्लांट दिलासा देनारा ठरणार आहे.