व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई: राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम असणार आहे. असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन
वाढवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. एक मेपर्यंत असलेला लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यानी वाढवण्याबाबत सरकार विचाराधीन होते. अखेर तसेच झाले.
सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.