नांदुरा- मोताळा रस्त्याचे काम जलदगतीने करा: आमदार राजेश एकडे

0
605

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

नांदुरा: मोताळा रस्त्याची सुधारणा करण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने या रस्त्यावरून येणे-जाणे, प्रवास करणाऱ्या नागरिकांची,शेतकऱ्याची प्रचंड गैरसोय होत आहे तसेच वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे. या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.यंत्रणेच्या अडचणी देखील समजून घेतल्या.नांदुरा-मोताळा रस्ता सुधारणा करण्याचे काम जलदगतीने पूर्ण करा,रस्त्याचे काम दर्जेदार असावे अश्या सूचना केल्या.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोल्याचे अधीक्षक अभियंता श्री.गिरीष जोशी, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता श्री.चंद्रशेखर शिखरे, उपकार्यकारी अभियंता श्री.सचिन तायडे, संबंधित रस्त्याचे कंत्राटदार पलसिध्दी कन्स्ट्रक्शन श्री.अर्जुन काटे, श्री.राजेश काटे, सुधीर कन्स्ट्रक्शन नागपूरचे श्री.डोईफोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleअकोला तहसीलचा पुरवठा निरिक्षक एसीबीच्या जाळ्यात
Next articleलाच प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here