व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर शासकीय दराने गहू व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली असून शेतकऱ्यांनी नजिकच्या खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी बी.वाय. शेख यांनी केले आहे.
नोंदणीसाठी येतांना शेतकऱ्यांनी आधार कार्ड, गहू, भरड धान्य नोंद असलेला सातबारा उतारा, बॅंक पासबुकाची झेरॉक्स सोबत आणावे,असेही कळविण्यात आले आहे. नोंदणी शुक्रवार दि.३० पर्यंत सुरु राहणार आहे.
तालुकानिहाय खरेदी केंद्र याप्रमाणे ..
अकोला- अकोला तालुका खरेदी विक्री संघ मर्या. अकोला
बाळापूर- बाळापूर तालुका खरेदी विक्री संघ मर्या.बाळापूर
पातुर तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पातुर
मुर्तिजापुर तालुका खरेदी विक्री संघ मर्या. मुर्तिजापूर
अकोट तालुका खरेदी विक्री संघ मर्या. अकोट
बार्शी टाकळी तालुका खरेदी विक्री संघ मर्या. बार्शी टाकळी
तेल्हारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, तेल्हारा