स्वास्थ्य हीच खरी संपत्ती आणि सुखी जीवनाचा मंत्र !

0
471
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने..

जगभरात 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी हा दिवस आहे.  7 एप्रिल 1950 पासून आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. आणि आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की कोरोना ने आपल्याला खुप काही शिकवलं. मात्र संसर्ग रोखण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी जागतिक पातळीवर भारतीय संस्कृती आचरण्यात येत आहे. यावर्षीची जागतिक आरोग्य दिनाची थिम आहे.
Building a fairer, healthier world for everyone 
म्हणजेच एका सुसंस्कृत आणि निरोगी जीवनाची सुरुवात. मला वाटतं त्या दृष्टीने भारताचे खुप योगदान आहे. आपली खास संस्कृती जीवनशैली योगाभ्यास या सगळ्या गोष्टी निरोगी दिर्घायुष्याकडे नेणा-या आहेत. घरात आल्यावर हातपाय धुणे ही तर प्राचिन परंपरा आहे. काही खाल्यानंतर चूळ भरणे, हात धुणे, संतुलीत आहार घेणे, अशा गोष्टीचं आचरण केल्याने नक्कीच फायदा होईल. तसेच भारत जगातील सर्वात मोठा औषधनिर्माता देश ठरला असून विविध देशांना भारताने लसीचे डोस पाठवले आहेत. नक्कीच एक सुसंस्कृत आणि निरोगी जग बनवण्यासाठी भारताचे खुप मोठे योगदान आहे. कारण स्वास्थ्य हीच खरी संपत्ती आणि सुखी जीवनाचा मंत्र देखील आहे.
– पुजा तेरेदेसाई, आहारतज्ज्ञ, खामगाव जि. बुलडाणा
Previous articleअकोल्यात ३० एप्रिल पर्यंत रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Next articleगहू व भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here