नांदुरा नगरसेवक व नागरीकांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुराः स्व नारायण भाईजी गोरले मार्ग ते नांदुरा खुर्द कडे जाणारा रस्ता या रस्त्याने दिवसभरात जड वाहनांच्या गर्दीमुळे कित्येकदा मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन त्यातून वाहनधारकांमध्ये बऱ्याच वेळा किरकोळ वादाचे प्रसंग उदभवतात या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, महिला ,पुरुष,युवक आणी वृद्धांची ये जा एकसारखी सुरू असते एखादे जड वाहन या रस्त्यावर काही वेळ थांबले तर दोन्ही बाजूने छोट्या मोठ्या वाहनांची गर्दी होवुन नागरिकांना जीव मुठीत घेवून तारेवरची कसरत करीत रस्ता पार करावा लागतो.
या रस्त्यामुळे भविष्यात शहराची शांतता सुद्धा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो तरी स्व नारायण भाईजी गोरले मार्ग वनवे झाल्यास जड वाहने या मार्गाने जावीत परंतु पुन्हा परत येणार नाहीत अशी लवकरात लवकर नगर परिषदेच्या वतीने व्यवस्था करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन नगरसेवक व नागरीकांच्या वतीने न प मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी नगरसेवक सर्वश्री संजय टाकळकर , मुख्तारसेठ,साजिदभाई,ऍड.मोहतेशाम रजा,महेश चांडक गोटू गायकवाड ,यांच्यासह शांतीलाल नाहर कैलाशभाऊ वर्मा, प्रवीण वसतकार,लक्ष्मण इंगळे,सोनूभैय्या जैस्वाल, प्रशांत परवाल,अमित गादीया,शुभम जैस्वाल, गोपाल बानाईत,संतोष जुनगडे,अर्जुन वसतकार,उमेश पांडव,महेश खेते आदी नागरीकांची उपस्थिती होती.