अतिक्रमण हटाव पथकावरच दगडफेक ! जनता बाजारात राडा, चोख पोलिस बंदोबस्त

0
286

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला : शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नव्या मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. मात्र आज मंगळवारी सायंकाळी अतिक्रमण हटविण्यासाठी जनता बाजारात गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावरच दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली.
जनता भाजी बाजाराच्या एका रांगेत आज सायंकाळी अतिक्रमण हटविण्यासाठी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्यासह अतिक्रमण हटाव पथक गेले. कारवाईला सुरुवात झाल्यावर थोड्या वेळात मनपा आयुक्त तेथून निघून गेल्या. त्यानंतर भाजी विक्रेत्यांवर कारवाई सुरु असतानाच, काही जणांनी आधी आलू, कांदे फेकणे सुरु केले. थोड्याच वेळात जेसीबीवर दगडफेक सुरु झाली. यामध्ये जेसीबीचा काच फुटला. घटनेची माहिती मिळताच, सिटी कोतवाली पोलिस घटनास्थळी पोहचले. वृत्त लिहेपर्यंत कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
आजच्या कारवाईने नव्यानेच रुजू झालेल्या मनपा आयुक्तांना अतिक्रमणकर्त्यांचा रोष आेढवून घ्यावा लागला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते जैन सन्सपर्यंत रस्त्याच्या कडेला उभ्या राहणा-या हातगाड्यांना महापालिका अभय देत असल्याचा आरोप होत होता. तसेच अतिक्रमण काढताना अतिक्रमण हटाव पथकाकडून भेदभाव होत असल्याचीही चर्चा होती. मात्र मनपा आयुक्तपदाचे सूत्रे हाती घेताच आयुक्तांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. या कारवाईत विभागप्रमुख प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
——— लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीची गरज
आधीच कोरोनामुळे वर्षभरापासून व्यापा-यांचे हाल बेहाल झाले आहेत. व्यवसायावर अवकळा आली आहे. अशा परिस्थितीत कुठेही दुकान थाटून चार पैसे मिळविण्यासाठी व्यापारी धडपडत आहेत. अशा परिस्थितीत कारवाईला प्रारंभ झाल्याने महापालिकेला अनेकांचा रोष आढवून घ्यावा लागत आहे. एकीकडे अतिक्रमण हटविणे व दुसरीकडे रोजगार देण्याचे प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. या परिस्थितीतून लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करुन तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यपरिस्थितीत उदरनिर्वाह चालविणेही अनेकांना कठीण झाले आहे.

Previous articleशेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू देणार नाही. शेतकरी नेते ललित बाहाळे यांनी धरले उपअभियंता यांना धाऱ्यावर !
Next articleएमपीएससी च्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here