पंकज भारसाकळे
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: तालुक्यातील वीज वितरक कंपनी ने शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता शेतकऱयांचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू केला. याला विरोध म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने वीजबिल सोक्षमोक्ष आंदोलन जाहीर केले.तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु ये:थे झालेल्या शेतकरी संघटनेच्या सोक्षमोक्ष आंदोलना मध्ये महावितरण च्या अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेत अवास्तव वीज बिल शेतकऱ्यावर आकारण्यात आलेली आहे.शेती पंपाचे वीज कनेक्शन पाच महिने बंद असतात हे संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केले. मिळणारी वीज ही सुरळीत नसल्यामुळे आणि विधुत भार सतत कमी जास्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या मोटर जळत असतात. मोटर जळाल्याचा भुरदड,आणि शेती पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. शेतकरी दुरुस्त केलेले बिल भरण्यास तयार असतांना सुद्धा बिल दुरुस्त करण्यास असमर्थ असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिलेले बिल हे वीज वापरण्याच्या कितीतरी पटीने असल्याचे पुराव्यानिशी महावितरण ने दिलेल्या कागदपत्रे वरून स्पष्ट करण्यात आले. अशी आकडेवारी शेतकरी संघटनेच्या वतीने सादर करण्यात आली.त्यामुळे सदर चे बिल दुरुस्त करून द्यावे व नंतर आम्ही त्यावर विचार करू अन्यथा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्यास शेतकरी संघटना घटनास्थळी पोहोचून त्यांना विरोध करेल. त्यांना कनेक्शन कापू देणार नाही असे ललित बाहाळे म्हणाले.या चर्चेदरम्यान शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते सतीश बाबा देशमुख ,शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,प्रतिष्ठित नागरिक अशोक घाटे,महावितरण चे उपविभागीय अधिकारी उईके,हिवरखेड चे ठाणेदार .चव्हाण चर्चेत सहभागी होते. यावेळी तालुका प्रमुख निलेश नेमाडे, दिनेश गिर्हे, अमोल मसुरकर, गोपाल चांडक, मकसूद मुल्लाजी, मंगेश रेळे, दिनेश देऊळकार,संजय ढोकने, असलंम उल्ला, इम्रान खान, मोहन खिरोडकार,मंगेश रेळे,याआदी उपस्थित होते.