व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई : कुत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुंबईतील 68 वर्षीय वृद्धाने धक्कादायक दावे केले आहेत. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं निर्लज्ज उत्तर अहमद शाहीने दिलं. आरोपी अहमद शाहीने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांना शिकार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. अहमद हा मुंबईतील जुहू गल्ली भागातील रहिवासी आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो हे भयंकर कृत्य करत असे. अहमद भाजी विक्रेता आहे. कुत्र्या-मांजरांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे.
प्राण्यांना खायला देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली आरोपी अहमदने चौकशीदरम्यान दिली. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं लंगडं समर्थन अहमदने दिलं. ‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ या एनजीओतील 45 वर्षीय प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांच्या तक्रारीनंतर डीएन नगर पोलिसांनी अहमदला अटक केली आहे.