व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: युवतीचा मृतदेह जळालेल्या स्थितीत शेतात आढळल्याने खळबळ उडाली. आई-वडिलांची माफी मागत आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीतं नमूद केलं आहे. युवतीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.
अकोला शहरालगतच्या यावलखेड शिवारात एका सतरा ते अठरा वर्षीय तरूणीचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. ती निंबी मालोकार येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून यात तरूणीने आता माझ्या लग्नासाठी खर्च करावा लागणार नाही असे लिहून आई-वडिलांची माफी मागत आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. नेमकी समिक्षाची हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिस करीत आहेत. तिचे आई-वडील दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अकोला येथे राहत आहेत.. युवतीचे वडील ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून मुलांना शिकवत आहेत. दरम्यानं, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्यासह स्थानिक पोलिस तपास करीत आहेत.