वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला विक्रेते दुग्ध व्यवसायी , किराणा व्यवसाई व किरकोळ व्यवसायी अशा थेट संपर्कात येणा-या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण , कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.
आज दि.12 रोजी जिल्हाधिकारी भवनाच्या नियोजन भवनात कोविड 19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया , आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, मनपा आयुक्त निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजबिये, उपअधिष्ठात डॉ. कुसूमाकर घोरपडे, अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत यांची उपस्थिती होती.
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या कोविड चाचण्या वर भर देणे आवश्यक असुन पॉझिटीव रूग्णाच्या संपर्कातील त्यांचे कुटूंबीय व इतर व्यक्तींचा कॉन्ट्रॅक ट्रेस करून कोविड चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच होम कॉरन टाईन केलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून ते बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासारख्या उपाययोजना कराव्यात तसेच ज्या व्यक्तींच्या घरी होम कॉरनटाईन ची व्यवस्था नसेल अशा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. लग्न समारंभावर लक्ष ठेवून नियमाचे उल्लघंन करणा-या वर कार्यवाही करावी.
आठवडी बाजार सध्दस्थितीत बंद आहेत परंतू भविष्यात आठवडी बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आठवडी बाजारात येणा-या दुकानदार व व्यापारी यांची कोरोना चाचण्या कराव्यात व आठवडी बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात.