व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील हिवरखेड पोलीसांच्या भूमिकेवर एका प्रकरणामूळे चांगलंच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. तेल्हारा तालूक्यातील दानापूर येथे ९ मार्चला एका सैनिकाच्या पत्नीला गावगुंडाने लोखंडी रॉडने मारहाण केलीय.
यात सैनिकाच्या दहा वर्षाच्या मुलालाही या गावगुंडाने मारहाण केलीय. सुनिता जामोदकर असं या मारहाण झालेल्या सैनिक पत्नीचं नाव आहेय. तर चिनू विखे असं या आरोपी गावगुंडाचं नाव आहेत. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस गावगुडांवर मेहेरबान का?, असा सवाल एका घटनेनं विचारला जातोय. कारण, एका सैनिकाच्या पत्नीला मारहाण करणारा आरोपी पोलिसांमूळे सध्या मोकाट फिरतो आहेय. सुनिता जामोदकर यांचे पती शिवदास हे बीएसएफमध्ये पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे कार्यरत आहेत. ९ मार्चला शेजारी राहणाऱ्या आरोपी चिनू विखेनं कारण नसतांना सुनिता यांना लोखंडी रॉडने मारहाण केलीय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेय. मात्र, तेेेेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीसांनी आरोपीविरूद्ध अतिशय शुल्लक गुन्हे दाखल करीत त्याला फक्त समज देत सोडून दिलेय. आज सैनिक शिवदासने पिडीत पत्नीसह जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केलीय. माजी सैनिक संघटनेनंही यात कठोर कारवाईची मागणी केलीये. यासंदर्भात पोलिसांकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.