मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: शनिवारी व रविवारी संपूर्ण बंदचा आदेश जिल्हा प्रशासनाने मागे घेतला आहे. त्यामुळे आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची संचारबंदी कायम असणार आहे.
आस्थापने दोन दिवस बंद ठेवण्याच्या आदेशानंतर जिल्हाभरातून व्यापारी, व्यावसायिकांचा रोष पाहता जिल्हा प्रशासनाने शनिवार, रविवार या दिवशी संपूर्ण लॉकडाऊनचा आदेश मागे घेतला आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली. दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचा आदेश कायम राहील, असेही श्री गीते यांनी म्हटले. त्यामुळे सुरुवातीला दोन दिवस कडक संचारबंदीचा आदेश रद्द समजण्यात यावा. पूर्वीच्या आदेशाचे शुद्धीपत्रकही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.