मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: शुक्रवार, आज संध्याकाळी 6 पासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. यामध्ये सर्वच दुकाने बंद राहणार आहेत.
कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असून या शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संपूर्ण संचारबंदी असणार आहे. आज शुक्रवार, 12 मार्च 2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून सोमवार, 15 मार्च च्या सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. संचारबंदी दरम्यान केवळ मेडिकल, हॉस्पिटल 24 तास उघडे राहतील तर दूध विक्रीला मर्यादित वेळेत म्हणजे सकाळ ते दुपारी आणि संध्याकाळी 2 तास वेळ राहील. इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार असल्याचे थोड्या वेळापूर्वी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे. इतर सर्व दुकाने बंद राहतील. नागरिकांनी नियमांचे पालन करून आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी केले आहे.