एमपीएससीच्या तारखेबाबत उद्या निर्णय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
385

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
मुंबई: गुरुवारी दिवसभर ज्या मुद्द्यावरून MPSC चे परीक्षार्थी आंदोलन करत होते, त्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असून येत्या आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे. पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का असेना, पण दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे.
वयोमर्यादा आडवी येणार नाही! 

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांना अजून एक दिलासा दिला आहे. MPSC ची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भिती वाटू लागली आहे. त्यानंतर परीक्षा देताच येणार नाही, याची देखील चिंता विद्यार्थ्यांना आहे. मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Previous articleआमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्नांनी 44 कोटीचा निधी प्राप्त
Next articleमलकापूर उपजिल्हारुग्णालयातील रक्तसाठा केंद्र बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here