मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
मलकापूर: विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार,विकास पुरुष,संघर्ष योद्धा श्री.राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा करून महा-विकास आघाडी शासना कडून रस्ते पूल ईमारत बांधकाम ईत्यादी विकास विकास कामासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर केला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार राजेश एकडे यांनी अर्थसंकल्प २०२१-२२, ग्रामविकास विभागाचा ३०५४ मार्ग व पुल, केंद्रीय मार्ग निधी,नांदुरा तहसील ईमारत,नांदुरा तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे निवासस्थान बांधकाम,नांदुरा येथील न्यायालय इमारतीचे उर्वरित बांधकाम अशा विविध कामासाठी सदरचा निधी प्राप्त झाला आहे यामध्ये १) जांबुळधाबा पिंपळगाव देवी फाटा रस्ता रु.१.५० कोटी,२) हिंगणेगव्हाळ चांदुरबिस्वा रस्ता रु३.५० कोटी,३)पान्हेरा वडोदा वडगाव दिघी मोमीनाबाद रस्ता रु५.०० कोटी,४) मलकापूर देवधाबा रस्त्यावरील मलकापूर स्मशानभूमी जवळील पूल रु.५.०० कोटी,५) निंभारी पुलाजवळ सौरक्षण भिंत रु.५०.०० लाख ६)पिंपळखुटा महादेव गावाजवळ पूल रु३.५० कोटी,७) मलकापूर देवधाबा रस्त्यावरील भालेगाव गावाजवळ पूल व रस्ता रु.१.६० कोटी,८)नांदुरा तहसिल ईमारत रु.८.१० कोटी,९)नांदुरा तहसीलदार व नायब तहसिलदार निवासस्थान रु.२.५० कोटी
१०)नांदुरा न्यायालयीन इमारत नांदुरा उर्वरीत कामे रु३.६० कोटी,११)भालेगाव निंबोळी शिवणी रस्त्यावरील पूल व वरखेड गावातील मुख्य रस्ता (केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरीस्तरावर) रु.५.०० कोटी १२) पिंप्री अढाव गावातील काँक्रीट रस्ता व पिंप्री पोटळी रस्त्यावरील पिंप्री आढाव गावातील पूल (केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरीस्तरावर)रु.१.५० कोटी याव्यतिरिक्त ग्रामविकास विभागाच्या ३०५४ मार्ग व पूल लेखाशिर्षका अंतर्गत १३)नांदुरा तालुक्यातील रोटी ते भोटा रस्ता पूलाच्या बांधकामासह सुधारणा करणे रुपये ५० लक्ष १४) नांदुरा तालुक्यातील अलमपुर ते पातोंडा रस्त्यावर अलमपूर गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे रुपये ४० लक्ष १५)मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा ते आळंद रस्ता सुधारणा करणे रु.६० लक्ष,१६) नांदुरा तालुक्यातील खातखेड ते वडगाव रस्ता रस्त्याच्या कामास सुधारणा करण्यासाठी रुपये ३० लक्ष इत्यादी कामाचा समावेश आहे.मलकापूर विधानसभा मतदार संघातील विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करून सदर कामे मंजूर करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर कामे मंजूर झाली आहे.तर अजूनही अनेक प्रस्थावित कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, परिणामी मागील २५ वर्षापासून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा खुंटलेल्या विकासाला आमदार राजेश एकडे यांच्या माध्यमातून चालना मिळून विकास कामे गतिमान झाल्याची निदर्शनास येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जनतेमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.