एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली!

0
480

व-हाड दूत न्युज नेटवर्क
मुंबई:
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्च रोजी होणारी परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
”राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्या सेवा पुर्व परिक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परिक्षा पुढे ढकलण्यात यावी” असे पत्राद्वारे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून कळविण्यात आले होते. त्यानुसार शासनाकडून उपरोक्त निर्णयानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 14 तारखेला महाराष्ट्रात 200 जागांसाठी एमपीएससी परीक्षा होणार होती.

Previous articleएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने महेशची आत्महत्या
Next articleआमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्नांनी 44 कोटीचा निधी प्राप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here