खुमगावच्या वाचनालय व अभ्यासिकेसाठी सढळ हाताने मदत करा!

0
524

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा जि. बुलडाणा: तालुक्यातील खुमगाव येथील सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेसाठी सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे. या पैशातून स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ती ज्ञानसंपदा उपलब्ध करून घेता येणार आहे.
गाव विकासासाठी निरपेक्ष भावनेने एकत्र आलेले तरुण सध्या 2 तास गावासाठी श्रमदान हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. गावातील घाण तर या श्रमदानाने स्वच्छ होतेय. परंतु मनं सक्षम करायची असतील तर उत्तम ग्रंथांच्या वाचनाशिवाय पर्याय नाही. तसेच गावातून स्पर्धा परीक्षेची आणि पोलीस भरती साठी तयारी करणाऱ्या मुलांसाठी सुसज्ज वाचनालय आणि अभ्यासिका याची बऱ्याच काळापासून गरज आहे. तेव्हा आता आणखी किती दिवस हा विषय पेंडिंग ठेवायचा?? तेव्हा आता आपण सर्व गावकरी मिळून हा विषय मार्गी लावूया.
त्यातील पहिला टप्पा म्हणजे पडून असलेले सभागृह अभ्यासिके साठी उपलब्ध करून घेणे हा होता.
तो सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि सर्व सदस्य यांनी मार्गी लावलेला आहे. सभागृह उपलब्ध झाले… परंतु चारही बाजूने उघडे असणारे सभागृह अभ्यासिकेत बदलण्यासाठी ते डेव्हलप करणे आवश्यक आहे… त्याला दरवाजे, खिडक्या, इतर
फर्निचर, लाईट फिटिंग, टॉयलेट आणि अर्ध्यापासून वर बांधकाम या सर्व कामासाठी अंदाजे 4 लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. यात 25×20 मुलांसाठी व 25×15 मुलींसाठी असे दोन हॉल तयार होतील. मुलामुलींसाठी दोन स्वतंत्र हॉल आणि स्वच्छतागृह, टेबल खुर्च्या,पुस्तके आणि पुस्तकांसाठी बुक शेल्फ इ. बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे.
तेव्हा या कामासाठी बाहेरंगावी नोकरी किंवा व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या तसेच गावातील दात्यांकडून सुद्धा सढळ हाताने मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. या कामातून गावाच्या पुढच्या पिढीसाठी एक अत्यावश्यक आणि विधायक काम आपल्याकडून होणार आहे. तेव्हा आपले गाव अधिक चांगले करण्यासाठी गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या वाचनालय आणि अभ्यासिका या उपक्रमासाठी आपण सढळ हाताने मदत कराल ही अपेक्षा. सर्व कामाचा हिशोब वेळोवेळी आपल्याला सादर केला जाईल याची आम्ही हमी देतो. एकप्रकारे गावच्या पुढच्या पिढीसाठी केलेली ही गुंतवणूक ठरेल आणि हा उपक्रम यशस्वी होन्यासाठी आपण सढळ हाताने मदत कराल अशी अपेक्षा गावक-यांनी व्यक्त केली आहे.
अधिक माहितीसाठी यांना करा संपर्क 
या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी सापूर्डाजी इलामे (९४०५२६८६००), गजानन वावगे (९५५२२९०७०३), रमेश मोळे (९८८१५९६२२५), विठ्ठल मुंढे (७८२२०४१५३६), सारंग फाळके (९८३४६७६०६८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन खुमगावकरांनी केले आहे. 

Previous articleनांदु-यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून इंधन दरवाढीचा निषेध
Next articleगितांजलीचा डबा घसरला; जिवित हानी नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here