बजेटमध्ये विदर्भाच्या वाटयाला वाटाण्याच्या अक्षदा- अॅड. आकाश फुंडकर 

0
340

आघाडीने बिघडवला विदर्भाचा विकासाचा आलेख !
बुलडाणा:
राज्यात आघाडी सरकारचे सरकार आले आणि संपुर्ण राज्याच्या विकासाला  खिळ बसली.  हया अर्थसंकल्पात विदर्भाच्या विकासासाठी भरपूर निधी मिळेल ही अपेक्षा असतांना केवळ खानापुर्ती करण्यासाठी  विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचे नांव राज्यातील अर्थसंकल्पात घेतलेले दिसते.  पेट्रोल डीजल वरील राज्याच्या करात कोणतीही कपाल केली नाही त्यामुळे सर्वसामन्य़ नागरीकांना न्याय देण्याच्या गप्प़ा करणा-या सरकारने सर्वसामान्यांना कोणताही  दिलासा दिला नाही.  वीज दरवाढीत देखील कोणतीही सवलत दिली नाही.  हा विदर्भासह संपुर्ण राज्यासाठी निराशाजनक असा अर्थसकल्प्‍ आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी दिली.
राज्यभरातील सर्व निधी पश्चिम महाराष्ट्राला पळविल्याची जुनीच परंपरा आघाडी सरकारने पुन्हा सुरु केली असून आज सादर झालेल्या  अर्थसंकल्पात  विदर्भ,मराठवाडा व उत्त़र महाराष्ट्राची  नावे केवळ खानापुर्ती करण्यासाठी  असल्याचे स्पष्ट़ झाले आहे.   पेट्रोल व डीजल दरवाढीसाठी ओरडणारे मोर्चे काढणारी सत्ताधारी स्व़त: मात्र राज्यात अवाजवी व भरघोस कर आकारुन सर्व सामान्य नागरीक व शेतक-यांना लुटण्याचे काम करीत आहे.   वीज दरवाढी बाबत ठोस निर्णय नाही.  त्यामुळे शेतक-यांना वीज  बिल व  दरवाढीमुळे आर्थीक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.  अर्थसंकल्पातील सर्व शिर्षकाखालील निधी फक्त़ पश्चिम महाराष्ट्रासाठी  वळविण्यात आला असून हा राज्याचा अर्थ संकल्प़ नसुन पश्चिम महाराष्ट्राचा अर्थ संकल्प़ आहे की काय अस वाटते. सर्व   अर्थाने हा अर्थसंकल्प़ निराशाजनक असल्याचे आकाश फुंडकर म्हणाले. 

Previous articleमुलींना समानतेची वागणूक मिळावी: रंजनाताई बोरसे
Next articleजिवंत वीज प्रवाहाच्या धक्क्याने चार बैलाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here