बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला.
रविवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी 137 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 313 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजपर्यंत एकूण कोरोनाबधित रुग्ण 5848 झाले असून 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोविड रुग्णालयात 1129 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय यंत्रणेने दिली.