सृष्टी सेवाभावी संस्थेचे नारीरत्न पुरस्कार जाहिर

0
851
सृष्टी सेवाभावी संस्थेच्या संस्थाध्यक्षा प्रिती शेगोकार यांची माहिती

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील सृष्टी सेवाभावी संस्थेने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यां कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा तथा नगर परिषद स्थायी समिती सदस्या प्रितीताई शेगोकार यांनी दिली.
सोमवारी 8 मार्च रोजी सकाळी 11 वा माऊली टाॅवर,माऊली हाॅस्पीटलचे वर ,जगदंबा चौक शेगाव येथे मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. माऊली गृपचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरदादा पाटील, सातपुडा शिक्षण संस्थेच्या संचालिका डाॅ स्वातीताई वाकेकर, श्री ग. म. मतिमंद विद्यालयाचे अध्यक्ष ह भ प गजानन महाराज वाघ यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
या महिलांचा होणार सन्मान
शेगाव पं स सभापती सौ शारदाताई लांजुडकर,उपसभापती सौ शालिनीताई सोनोने,इंदिरा गांधी पतसंस्थेच्या संस्थापिका सौ माधुरीताई देशमुख, बुरूंगले शिक्षण संस्थेच्या प्राचार्य सौ मिनाक्षीताई बुरूंगले, बुलडाणा जिल्हा बचत गट फेडरेशन च्या अध्यक्षा सौ जयश्रीताई शेळके, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ वैशाली घनोकार, स्री रोग तज्ञ डाॅ सबा हुसेन, सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या डाॅ प्राची जाधव,आरोग्य उपकेंद्रांच्या डाॅ मोनिका थोरात, गुणवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती सिरसाट अकोला, माविम च्या व्यवस्थापिका योगिता खोंड,सौ अंजलीताई देशपांडे.श्री गुरूदेव शिवण कला केंद्राच्या संचालिका सौ देवका उंबरकार या मातृशक्तींचा उद्या सन्मान होणार आहे.
Previous articleअकोल्यात दगडाने ठेचून गवंडीची हत्या, आरोपी अटक
Next articleजूनी पेन्शन योजनेसह शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here