माजी खासदार तथा दलितमित्र, समाजभुषण पंढरीनाथ पाटील जयंती विशेष…

0
753

बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री अगदी घरापर्यंत आणण्यासाठी ज्यांनी जीवाचे रान केले. संपूर्ण आयुष्य खर्ची घातले असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दलित मित्र, खासदार पंढरीनाथ पाटील. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे सहकारी असणारे पंढरीनाथ पाटील हे पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते, शिक्षणाच्या प्रवाहांमध्ये बहुजन समाजाला आणण्यासाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली या संस्थेची पाळेमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रोवण्यासाठी दलित मित्र पंढरीनाथ पाटील यांनी अपार मेहनत घेतली.
जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी संस्थाचे जाळेच उभे केले गावात शाळा आल्याने एक पिढी शिकून पुढे आली. त्याकाळी अनेक वकील डॉक्टर प्राध्यापक बहुजनातून तयार झाले ही पंढरीनाथ पाटलांची देणं आहे ,केलवद हे माझं गाव, गावा पासून तीन किलोमीटर अंतरावर शिरपूर येथे शिवाजी हायस्कूल आहे ,गावा पासून पूवेर्ला पाच किलोमीटर अंतरावर किन्होळा हे गाव आहे या ठिकाणीसुद्धा शिवाजी हायस्कूल आहे, गावापासून 11 किलोमीटर अंतरावर बुलढाणा आहे याठिकाणी शिवाजी विद्यालय आणि जिजामाता महाविद्यालय आहे, गाव पासून 14 किलोमीटर अंतरावर चिखली येथे शिवाजी विद्यालयाचा विस्तीर्ण परिसर बसस्थानक परिसरात आपल्याला बघायला मिळतो ,गाव खेड्यापर्यंत शिक्षण देण्याचे काम पंढरीनाथ पाटलांनी केलं. उदाहरणादाखल मी सांगितलं परंतु जिल्ह्यांमध्ये अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. चिखली ची संस्था जर आपण पहाली तर चिखली बस स्थानकावर किमान काही कोटी रुपये गुंठा जमीन मिळेल या ठिकाणी अठरा वीस एकर जमीन पाटलांनी मिळवली एवढी करोडोंची संपत्ती चिखलीमधेच आहे.
बुलढाणा येथे शिवाजी विद्यालय दिमाखात उभे आहे ,जिजामाता चा मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची जागा बहुजन समाजासाठी करून ठेवलेल्या या संस्थांमधून अनेक विद्यार्थी बाहेर पडत आहेत..
ज्या टाईमला शिक्षणाचा गधं नव्हता त्या टायमाला गावांमध्ये शाळा आली आणि एक पिढी झपाट्याने शिकली अनेक लोक जुन्या काळामध्ये आपल्याला दिसतात आणि विचार येतो की हे प्राध्यापक कसे झाले प्राध्यापक होण्याची किंवा डॉक्टर होण्या साठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाऊसाहेब पंजाबराव आणि पंढरीनाथ पाटलांनी केले.
शिवाजी शिक्षण संस्था जेव्हा अडचणीत आली होती त्या वेळी शिवाजी शिक्षण संस्था बंद पडतेकी काय अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस पाटील हैदराबादला निजामकडे गेले.
निजामास त्यांनी आपले शैक्षणिक कार्य पटवून दिले, निजामास ते पटले व त्यांनी लाखोंची मदत अमरावतीच्या संस्थेला दिली, निजामाची मदत यावरून कोलेकुई झालीच मात्र मला समाज साक्षर करायचाय त्यासाठी पाकिस्तान मधून मदत मिळाली तर घेईन अशी भूमिका छातीठोक पणे खासदार पंढरीनाथ पाटलांनी घेतली.
जिल्हा रुग्णालय आज दिसते अशे न्हवते,कौलारू छताखाली छोटासा दवाखाना चालायचा या दवाखान्याला आधुनिक करण्याचे काम पंढरी पाटलांनी केलं. बुलढाणा मध्ये जेव्हा पन्नास ,शंभर रुपये गुंठा प्लांट किंवा दोन तीनशे रुपये शेती मिळायची अशावेळी जिल्हा रुग्णालयाचा विस्तीर्ण परिसर आणि त्यासाठी पाटलांनी दिलेली धनराशी अनमोल आहे ,आज जिल्हा रुग्णालय जी सुस्थितीमध्ये दिसते त्याच्या मुख्य इमारतीचा भाग तयार करण्यात पाटलांनी पुढाकार घेत वर्गणीतून तो स्वत: बांधला, त्या साठी स्वत: पुढे आले, तेव्हा परिपूर्ण खºया अथार्ने जिल्हा रुग्णालय साकारले.
बुलढाणा येथे मेडिकल कॉलेज होऊ घातले आहे ,बुलढाणा मध्ये जर मेडिकल कॉलेज झाले तर त्याचा बेस जिल्हा रुग्णालय असेल आणि त्याच्या पाठीमागे दलित मित्र खासदार पंढरीनाथ पाटलांचे महत्त्वाचे प्रयत्न सुद्धा. एकीकडे शिक्षणाच्या प्रवासात समाजाला आणत असताना आरोग्याचा प्रश्नही पाटलांनी तेवढ्याच ताकतीने हाताळला, आणि हे करत असताना स्वत:चा स्वार्थ यांनी कुठेच येऊ दिला नाही,
पंढरीनाथ पाटील हे एक समाज प्रबोधनकार पण होते ,गावामध्ये जायचे, आपली स्वत:ची जीप गाडी असायची ,त्याच्यामध्ये चार सवंगडी असायचे आणि डफावर पंढरीनाथ पाटील पोवाडे म्हणायचे ,हे पोवाडे किंवा त्यांनी गीत सादर केली ती गीत ही समाजप्रबोधनाचं काम करायची, गाडगे महाराज लोकांमध्ये जाऊन लोकांना खरा धर्म सांगायचे त्याच पद्धतीने पंढरीनाथ पाटलांनी सुद्धा लोकांना खरा धर्म सांगितलेला आहे ,धर्मावर चढलेली पुटे बाजूला करण्याचे काम पंढरीनाथ पाटलांनी केलं,??
यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ राबवली ,या सहकारी चळवळीच्या माध्यमातून मराठा समाजाला मोठा लाभ मिळालेला आहे , कारखानदारी आणि शिक्षण समाजाकडे आले,मराठा शेतकरी हा मराठा कारखानदार झाला, त्याच्याकडे शुगर फॅक्टरी आली , सामान्य शेतकरी हा बँक संचालक झाला, संस्थापक झाला याच्या पाठीमागे यशवंतराव चव्हाणांनी केलेले रचनात्मक कार्य आहे, त्याच पध्दतीने शैक्षणिक कार्य पंजाबराव देशमुख आणि पंढरीनाथ पाटलांनी केली या दोन तीन लोकांमुळे आज मराठा समाज काही अंशी तरी स्टेबल आहे अन्यथा समाजामध्ये आत्महत्या सुरू आहे या कितीतरी पटीने वाढल्या असत्या, परंतु दुदैर्वाने त्यांची जयंती आहे आणि ज्यांच्याकडे मोठ्या संस्था आहेत त्यांनाही हे माहीत नाही,आणि समाजाच्या जडणघडणीत कोणते योगदान दिले नाहीत त्याचा वाढदिवस समाज परवाच साजरा करत होता हे दुदैर्वी चित्र पाहायला मिळालं, पंढरीनाथ पाटील ,यशवंतराव, पंजाबराव देशमुख यांच्या सारख्या लोकांचा म्हणजे बापाचा वाढदिवस आहे हे समाजाला लक्षात राहत नशेल तर समाज आत्महत्येकडे जाणारच आहे ,कारण आमचा बाप कोण हेच आम्हाला माहिती माहिती नाही.
एकीकडे राजकारण म्हणजे सर्व काही राजकारणासाठी वाटेल ते करणारे नेते समाजामध्ये आहेत, एक आमदारकी– एक खासदार की समाजापेक्षा श्रेष्ठ ठरते असे दुदैर्वी चित्र आज समाजामध्ये दिसते म्हणून तर पंधरा-पंधरा वीस-वीस लाखाचे मोर्चे आम्हाला काढावे लागतात ,वास्तविक पाहता समाजाला रस्त्यावर येण्याची गरज नाही ,समाजाचे 50 आमदार एका बाजूला झाले ,25 खासदार जरी एका बाजूलाआले तर समाजाचा प्रश्न मार्गी लागण्यास वेळ लागणार नाही ,परंतु समाजाच्या मूलभूत प्रश्नापेक्षा आमदारकी श्रेष्ठ हीच भूमिका स्वार्थी नेत्यांची कायम राहिली आहे ,अशा वेळी जिल्हा रुग्णालयासाठी, रुग्णालय बांधण्यासाठी स्वत: पैसे देणारे पंढरीनाथ पाटील ,शिवाजी शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी निजामाकडे गेलेले पंढरीनाथ पाटील मला तर देवदूतच वाटतात.
आज त्यांचा जन्मदिन, साहेबांना विनम्र अभिवादन!!

– गणेश निकम केळवदकर
मो.क्र. 940347840

Previous articleजिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी स्वीकारला पदभार
Next articleबुलडाण्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here