व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले. तर दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाले असून आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासकीय स्त्री रुग्णालयातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर लस टोचून घेतली. त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांनीही लसीकरण करुन घेतले, यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल उपस्थित होत्या.
शहरात जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच मनपाच्या भारती हॉस्पीटल, कस्तुरबा हॉस्पीटल व जिल्ह्यात प्रत्येकी तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर शासकीय मोफत लसीकरण कार्यक्रम सुरु आहे. तसेच जिल्ह्यात संत तुकाराम हॉस्पीटल, सिटी हॉस्पीटल, माऊली मॅटरनिटी व सर्जिकल हॉस्पीटल, डॉ. के.एस. पाटील हॉस्पीटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पीटल, श्रीमती बी.एल. चांडक रिसर्ज फाऊंडेशन(वसंती हॉस्पीटल) आणि शुक्ला मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटल या सहा खाजगी केंद्रावर लसीकरण सशुल्क 250 रुपये प्रती प्रमाणे लसीकरण करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कोविन ॲपवर नोंदणी करुन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.