कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून चाचण्यांचे प्रमाण वाढवा: पियुष सिंह

0
273
मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : कोविड या साथरोगाने पुन्हा उचल खाल्ली आहे. विभागातील जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोविड रूग्णसंख्या वाढली आहे. तरी यंत्रणेने बाधीत रूग्णाच्या निकट व बाह्य संपर्कातील व्यक्ती ट्रेस करून कोरोना चाचणी करावी. कोविड नियंत्रणासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
स्वॅब घेण्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वाढविण्याचे आदेशीत करीत विभागीय आयुक्त म्हणाले, ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे. बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता कामा नये. बाधीत रूग्णांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी. होम आयसोलेशनची सुविधा बंदच ठेवावी. होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. जेणकरून सदर बाधीत रूग्ण बाहेर फिरत असल्यास दिसून येईल. ज्या रूग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रूग्णांना होम आयसोलेशन दिले असल्यास त्यांच्या घरावर विलगीकरण केल्याच्या तारखेसह स्टीकर चिकटवावे. आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टींग करून घ्यावे. कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असाव्यात. जेवणाचा दर्जा चांगला ठेवावा. स्वच्छतेच्या बाबत कुठलीही तडजोड नसावी. दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांचे आठवड्याला तपासणी करून घ्यावी.
लसीकरणाबाबत आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंगचा नियम पाळावा व हात वारंवार धुवावे या त्रि सुत्रींचा कटाक्षाने पालन झाले पाहिजे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई करण्यात यावी. बैठकीला संबंधीत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पॉझीटीव्ही रेट, मृत्यू दर, ऑक्सीजन बेड, आयसीयु बेड आदींचाही आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला.
Previous articleमुंबईतील पंचतारांकित हॉटेल ताज लँड अँड वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, मुदत बाह्य अन्न साठा तसेच स्टोरेज कक्षात आढळले झुरळ
Next articleजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतली कोविड प्रतिबंधात्मक लस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here