मंगेश फरपट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
शेगाव: विदर्भाची पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात यावर्षीच्या श्री संत गजानन महाराजांच्या १४३ वा प्रगटदिनोत्सवात भाविकांना सामील होता येणार नाही. सध्या बुलढाणा जिल्ह्यात कोरोना आपले पाय पसरवीत असल्या कारणांनी जिल्हाधिकारी बुलढाणा एस राममूर्ती जिल्ह्यात धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशीत असल्याने यावर्षीचा १४३ वा प्रगटदिनोत्सव मंदिरात अंतर्गत कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
श्रींचा प्रगटदिन उत्सव सालाबादाप्रमाणे दरवर्षी श्री संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांचे उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोना महामारीचे संकट पसरले असल्याने, तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाचे निर्देशानुसार प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देशीत असल्याने शुक्रवार दि.०५ मार्च, २०२१ रोजी असलेला श्रींचा १४३ वा श्री प्रगटदिनोत्सव सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार नाही. उत्सवातील कार्यक्रम धार्मिक प्रथा-परंपरेनुसार मोजक्या उपस्थितीत अंतर्गतच संपन्न होतील. अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानकडून देण्यात आली आहे.
© All Rights Reserved