मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: येथून जवलच असलेल्या कमळनाथ येथील होणारा भागवत सप्ताह व यात्रा महोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे अशी माहिती संस्थानचे विश्वस्त मंडळ यांनी दिली आहे.
खामगाव तालुक्यातील कमळनाथ येथे दरवर्षी गजानन महाराज प्रगट दिन ते महाशिवरात्रि प्रयत्न भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते व शेवटच्या दिवशी मोठा यात्रा महोत्सव भरत असतो परंतु सध्याची करोना जन्य परिस्थिती लक्षात घेता व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून यावर्षीचा दिनांक 5 मार्च ते 11 मार्च 2020 चा भागवत सप्ताह आणि यात्रा महोत्सव रद्द करण्यात येत आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी असे कळकळीचे आवाहन कमळनाथ संस्थान च्या संचालक मंडळांनी केली आहे