लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार

0
394

तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
संग्रामपूर: लग्नाची आमिष दाखवून सतत युवतीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण करणा-या एका आरोपीसह मदत करणारे दोन अशा तीन आरोपींवर सोनाळा पोलिस स्टेशनला सोमवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम आलेवाडी येथील एका २२ वर्षीय यूवतीला सन २०१७ पासून गावातीलच यूवकाने लग्नाचा आमिष देत इच्छा नसतांना युवतीचे लैंगिक शोषण केले. सदर युवक युवतीला वेळोवेळी त्याच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार करत होता. आरोपी आदिल अब्बास सूरत्ने याने पिडित युवतीला २९ जुलै २०१९ रोजी लग्नाची आमिष देऊन घरी नेऊन ठेवले. त्या दरम्यान सुद्धा आरोपीने यूवती सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेत आरोपीला त्याचे भाऊ अबुजर अब्बास सुरत्ने, आबिद अब्बास सुरत्ने या दोघांनी मदत केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर बाब यूवतीच्या घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी सोनाळा पोलीस स्टेशन गाठले होते. मात्र काही प्रतिष्ठित नागरिकांनी पीडित युवतीच्या घरच्यांची समजूत काढून आरोपी आदिल सुरत्ने सोबत लग्न लावून देण्याचे ठरविले होते. ३० जूलै २०१९ ला नोटरीच्या माध्यमातून आपसी करारनाम्यात २ जानेवारी २०२० ला लग्न ठरविण्यात आले. या नोटरी वरील करारनाम्यावर आरोपी, प्रतिष्ठित मध्यस्थींचे छायाचित्रासह सह्या आहेत. आपसी करारनाम्यात ठरल्याप्रमाणे २ जानेवारी २०२० ला लग्नाच्या दिवशी आरोपी हजर झाला नाही. याबाबत युवतीच्या नातेवाईकांनी आरोपीच्या कुटूबियांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व आरोपीला कोठेतरी पाठवून दिले. या सर्व प्रकरणात आरोपीला कुटुंबातील दोघांनी पाठबळ दिले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. २२ वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिस स्टेशनला आरोपी आदिल सुरत्ने व मदत करणारे अबुजर सुरत्ने, आबिद सुरत्ने या तिन्ही भावांवर कलम ३७६(२)(n), ५०४,५०६ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सोनाळा पोलिस करीत आहेत.

Previous articleनिराधार महिलांच्या वेदनेला वेदांत करणाऱ्या विरस्त्री लताताई देशमुख : साधना पाटील
Next articleतर… पश्चिम विदर्भात शिवसेनेचं चांगभलं ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here