वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: निराधार अशा विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीता महिलांच्या वेदनांचा वेदांत करुन त्यांना आधार मिळवून देण्यासाठी आपली आहुती देणार्या वीरस्त्री स्वर्गीय लताताई देशमुख होत, असे प्रतिपादन स्वामिनी संघटना जिल्हाध्यक्षा साधना पाटील यांनी केले.
स्वामिनी विधवा विकास मंडळाने आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामिनी संघटना सचिव प्रा. सुनिता डाबेराव होत्या. तर प्रमुख उपस्थिती संघटिका सुनिता टाले पाटिल, सह संघटिका मिरा वानखेडे पाटिल, जिल्हा उपाध्यक्ष रेहाना परवीन, कार्यालय प्रमुख अनघा पाठक, प्रा. केतकी कुळकर्णी – सरजोशी यांची होती. स्वामिनी विधवा विकास मंडळ या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीता महिलांच्या हक्काच्या संघटनेने अनेक निराधार महिलांना आधार मिळवून दिला. आंदोलने करून राज्य शासन आणि केंद्र शासनाला अनेक धोरणे या महिलांसाठी अंमलात आणली आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोनाच्या भयानक परिस्थितीत सुद्धा संघटनेने कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता अत्यंत गरजू महिलांना मदत करत आहे. तीन पुनर्विवाह सुद्धा मागिल वर्षी जुळविण्यात संघटनेला यश आले आहे. 43 व्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम कोरोना व्हायरस पासुन आपला बचाव करण्यासाठी छोट्या प्रमाणात घेण्यात आल्याची माहिती मनिष देशमुख यांनी दिली. गत वर्षी प्राचार्य डॉ. विना मोहोड, स्वाती जोशी, डाँ मापारी मँडम, डाँ. मीनाक्षी मोरे, प्रा. सुनिता बनणे, सारिका जयस्वाल, भूमिका भाटिया, कमल भायानी, अँड कविता तायडे, डाँ. स्नेहा बजाज अग्रवाल, रश्मी जगताप, रोशनी कोठारी, देशमुख मँडम, ओबेरॉय मॅडम, मधुमती जैन यांनी सढळ हस्ते केलेल्या मदती बाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन काजल अग्रवाल यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन कोरोना संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संघटनेत कार्यरत होऊन निराधार महिलांच्या करिता झटणार असल्याचा संकल्प व्यक्त केला.