पूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा; राष्ट्रीय बंजारा समाज युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांची मानोरा पोलिसात तक्रार

0
492

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशीम: राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी पूजाचे चारित्र्यहनन प्रकरणी देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करा अशी तक्रार मानोरा पोलिस स्टेशनला केली आहे.
मागील काही दिवसापासून पूजा लहुजी चव्हाण मृत्यू प्रकरणात पूजा तसेच तिच्या परिवारासह संपूर्ण बंजारा समजाची बदनामी होत आहे. पूजा ही बंजारा समाजाची मुलगी असून संपूर्ण समजावर शोककळा पसरली आहे. परंतु भाजप नेत्यांनी अतिशय खोडसाळपणे तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून तिचे चारित्र्य हनन केले आहे व अजुनही करतच आहे. यामध्ये पूजच्या परिवारासोबतच संपूर्ण बंजारा समाजाची देखील बदनामी होत आहे. पूजाच्या आत्महत्तेची तपासणी पोलिस करत आहेत. परंतु भाजपच्या काही नेत्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सदर पोलिस अधिकार्‍यांवर दबाव टाकून तपासात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे संबंधित नेत्यांवर गुन्हे दाखल करून न्याय द्यावा. यांच्यावर तत्काल कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने संपून भारतभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही राठोड यांनी दिला आहे.

Previous articleअकोल्यात वृद्ध व दुर्धर रुग्णांना कोविड लसीकरणास आरंभ
Next articleकाय चाललंय बुलडाण्यात! आजही 427 पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here