वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशिम :14 दिवसापासून अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे उद्या पोहरादेवीला येत असल्याची माहिती देवस्थान च्या महंतांनी दिली आहे.या संदर्भात व्हाट्सअप ग्रुप सक्रिय झाले असून “चलो पोहरादेवी’ ही मोहीम व्हाट्सअप ग्रुप वर संजय राठोड यांच्या समर्थकाकडून राबविण्यात येत आहे. परंतु सध्या जाहीर कार्यक्र्म बंद असल्याने संजय राठोड येथे येतील का व आलेच तर कार्यक्रम कसा असेल या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
उद्या सर्व महंतांनी संजय राठोड हे येणार असल्याचे ठरवले असले तरी पोहरदेवीचे सर्वात मोठे म्हणजे धर्मगुरू बाबूसिंग महाराज उपस्थित राहणार नाहीत. ते कालच मूर्ति स्थापनेकरिता कर्नाटक ला गेलेले आहेत आणि उद्या ही नसणार आहेत,त्यामुळे संजय राठोड यांना धर्मगुरूचा आशीर्वाद कसा मिळेल? या विषयी चर्चा सुरू आहेत.
23 फेब्रुवारी, मंगळवारी सकाळी अकरा च्या सुमारास संजय राठोड हे संपूर्ण कुटुंबं सोबत पोहरादेवी येथे येत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.येथे विधीवत पूजा आटोपून तसेच संतांचे दर्शन घेऊन ते या ठिकाणाहून निघातील.राठोड या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास ते नेमके काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.