आता चिंता नको, जाणून घ्या जनता कर्फ्यूची वेळ

0
574

मंगेश फरपट
वऱ्हाड दूत ऑनलाईन
खामगाव : ‘माझे कुटंूंब माझे जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू पुकारला असला तरी आता चिंता करण्याची गरज नाही. स्थानिक व्यापारी बांधवांना विश्वासात घेवून आपल्या गावात दुकाने सुरु राहण्याची वेळ स्थानिक प्रशासनाने निश्चित केली आहे.
शुक्रवारी जिल्हयात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कुठे दुकाने सुरु तर कुठे बंद अशाप्रकारचे चित्र पहायला मिळाले. मलकापूर व बुलडाणा शहरात व्यापारी बांधवांनी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तर इतर ठिकाणी जनता कर्फ्यू पाळण्यात आला नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी व्यापारी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गेले. यावर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली.
त्यानुसार खामगाव शहरात तहसीलदार शीतल रसाळ, ठाणेदार सुुनिल अंबुलकर, प्र.मुख्याधिकारी सुर्यवंशी यांनी व्यापाºयांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीतील चर्चेअंती ३० सप्टेंबरपर्यंत खामगाव शहरात दर रविवारी कडकडीत बंद पाळल्या जाईल असे ठरले. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहतील. मात्र विक्रेत्यांसह नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. ‘माझे कुटंब माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे. जेणेकरून आरोग्य पथकाला वैद्यकीय तपासणीसाठी मदत होईल, असे आवाहन तहसीलदार शितल रसाळ यांनी केले आहे.

नांदुरा येथे 3 दिवस कडक जनता कर्फ्यु

कोरोना साखळी तोडण्यासाठी व माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी 20 ते 22 सप्टेंबर 3 दिवस शहरात कडक जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे. तर 23 सप्टेंबर पासून शहरातील सर्व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील. कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार राहूल तायडे यांनी केले आहे.

Previous articleनगराध्यक्ष अॅड हरीश रावळांची शहरात युध्दस्तरावर सॅनिटायझर फवारणी
Next article‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम; जिल्हादंडाधिकारी एस. राममूर्ती यांचे आदेश लागू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here