व-हाड दूत न्युज नेटवर्क
नागपूर: महानगर पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्तुती केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नागपूर महानगरपालिकेत ‘कोविड योद्धाचा सन्मान’ करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांची स्तुती केली आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. कोरोना काळात तुकाराम मुंढे आयुक्त असताना तुकाराम मुंढे विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला होता. यामध्ये भाजपचे विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी आणि संदीप जोशी आघाडीवर होते. त्यामुळे मुंढे यांची बदली देखील करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी मुंडे यांची स्तुती केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.