व-हाड दूत न्युज नेटवर्क
नांदुरा: वीज बिल माफ करण्यात दिरंगाई करणा-या महाविकास आघाडी सरकारचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी कंदिल अन दिवे लावून रोष व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लॉकडाउन काळातच संपूर्ण महाराष्ट्रभर विज बिल माफी साठी निवेदन देऊन विनंत्या करण्यात आल्या. मागणी पूर्ण न झाल्यामुळे अनेक महावितरण कार्यालयांची तोडफोड सुद्धा करण्यात आली. एवढेच नव्हे तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा सुद्धा काढण्यात आला. यात अनेक महाराष्ट्र सैनिक व पदाधिकाऱ्यांना धरपकड करण्यात आली. यावर मुख्यमंत्रीमहोदयांनी सुद्धा सांगितले होते की वीज बिलात सवलत देणार आहे. यासंदर्भात आढावा बैठक घेणार. पण शेवटी राज्य सरकारने सुद्धा जनतेच्या हातावर तुरी दिल्या. एवढ्यावरच न थांबता मनसेच्या वतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली पण शेवटी काय करणार जनते विरोधी सरकारची झोप उघडत नाही आहे.
महाराष्ट्र अंधकारमय करा तेव्हा डोळे उघडतील – मनसे
या सरकारचा निषेध हा दररोज करावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा च्या वतीने लोकांना आवाहन करण्यात येत आहे व आघाडी सरकार व महावितरणच्या विरोधात पुरवठा खंडित करण्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्व उपकरणे बंद करून वीज पुरवठा बंद करून अंधारमय वातावरण स्वीकारले आहे. घरात दिवे व कंदील लावण्यास सुरुवात केली आहे. मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी सर्व विद्युत पुरवठा बंद करून संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय करावा तेव्हा सरकारच्या व महावितरणच्या डोक्यात उजेड पडेल. सदर निशेध करताना मनसे तालुकाध्यक्ष भागवत उगले. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर, राजू काळे,तालुका अध्यक्ष(सोशलमीडिया )इंजि. योगेश अरुण सपकाळ, मनसे शहर अध्यक्ष सागर जगदाळे, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे ,अजय बेलोकार ,मनविसे माजी शहर अध्यक्ष प्रवीण माळी. शहर संघटक विशाल बग्गन ,गुड्डू जैन विठ्ठल निंबाळकर ,लक्ष्मण बारगजे. सोपान फाटे,सचिन तायडे,गौरव टेंभुर्णी,कार्तिक काजळे,गुड्डू राठोड अनेकांनी कंदील व दिवे लावून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे व लोकांना सुद्धा सरकारचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे .लवकरच एक संघ पणे संपूर्ण महाराष्ट्रात एक संघ अंधारमय वातावरण करण्याचे आवाहन सुद्धा मनसे करणार आहे.