चला बोटींगला! ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीसह बरेच काही!

0
571

प्रशांत खंडारे
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील वैभव असलेल्या विविध वृक्षप्रजाती, वन्यजीव, डोंगरद-या, तलाव आदी बाबींसह विपुल नैसर्गीक सौंदर्याने नटलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या पायथ्याशी पलढग धरण आहे. या धरणात बोटींगची सुविधा असून पर्यटकांचा बोटींगला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
येथे सध्या दोन बोटींगची सुविधा आहे. ज्ञानगंगा जंगल सफारीसाठी चिंच फाटा, गोंधनखेड गेटजवळ जिप्सी बुकिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे. आता जंगल सफारीबरोबरच पर्यटकांना बोटींगचा आनंद घेता येणार आहे.

दोन्ही बोटी अतिशय उच्च तंत्रज्ञानाने तयार करण्यात आल्या असून सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. प्रशिक्षित चालक बोटी चालवत आहेत. तसेच याठिकाणी लाईफ सेव्हींग जॅकेटची सुविधाही येथे उपलब्ध आहे. तरी पर्यटकांनी या बोटीचा जंगल सफारीसाठी जिप्सीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक व्ही.जी.साबळे यांनी केले आहे.

Previous articleश्री शिवाजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत
Next articleराज्य परिवहनतर्फे दर रविवारी पर्यटन विशेष बस सुविधा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here