व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ऊन्हाळी २०२० च्या एम काॅम परिक्षेत स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.
कु अपेक्षा प्रमोद सांगोले ही ४ थी, कु मिना सदाशिव राठोड ही ८ वी तर जितेश गजानन इंगळे हा ८ वा मेरीट आला आहे. वाणिज्य शाखेतून पहील्यादाच तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकल्याबद्दल त्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे डाॅ विठ्ठल वाघ, श्री प्रशांत देशमुख, प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, प्रबंधक अशोक चंदन,वाणिज्य विभागाचे प्रमुख डाॅ अनिल राऊत, विद्यार्थी विकास अधिकारी डाॅ संजय तिडके, डाॅ उल्हास मेडशीकर, डाॅ गणेश खेकाळे, डाॅ सविता निचित, प्रा संगीता शेगोकार डाॅ मोना पाटील,डाॅ हेमलता मोर यांनी अभिनंदन केले आहे.