डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची यवतमाळला बदली
बुलडाणा: गृहविभागाने राज्यातील काही ठिकाणच्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या १७ सप्टेंबररोजी केल्या आहेत. त्यानुसार विद्यमान जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांची बदली यवतमाळ येथे करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिक्षक अरविंद चावरिया रूजू होणार आहेत. लोकाभिमुख अधिकारी म्हणून अरविंद चावरिया यांची ओळख आहे. पोलिस दलातील त्यांनी उल्लेखनीय बदल करून आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.