अकोला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकार कडून अनेक अडचणी लादण्यात आल्या आहेत.पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर अनेक प्रकारचे निर्बंध राज्य सरकारने घातले आहेत;या राज्यात दारूची दुकाने, नाईटलाइफ,बार सुरु झालेले चालतात, त्या ठिकाणी गर्दी झाली तर सरकार काहीच बोलत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात मात्र अडचणी तयार केल्या जातात.धार्मिक भावना भडकवणार्या आणि जातीजातीमध्ये विष कलवणाऱ्या यलगार परिषदांना राज्य सरकार परवानग्या देते , परंतु महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मात्र अनेक निर्बंध घातले जनता वतीने राज्य सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध आमदार शर्मा यांनी केला तसेच कोणत्याही अटी शर्ती विना छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.