व-हाड दूत न्युज नेटवर्क
रिसोड ता. वाशीम: पोलिस पाटलाने बालकावर छ-याच्या बंदुकीने गोळी झाडून जखमी केल्याची घटना चाकोली ता. रिसोड येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस पाटील गोविंद गरकळ यांच्याकडे शेतातील माकडं हाकलण्याची बंदूक आहे. गावातीलच आेम गरकळ हा मुलगा चहाची पुडी आणण्यासाठी पोलिस पाटील यांच्या घरासमोरून जात होता. आेम जवळ येताच पोलिस पाटलाने त्याच्यावर नेम धरून गोळी झाडली. यामध्ये आेम जखमी झाला असून त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. याप्रकरणी त्याचे काका दिलीप रामराव गरकळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पाेलिस पाटील गोविंद गरकळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.